Karnataka HC eSakal
देश

Karnataka HC : भांडणामध्ये पुरुषाचे प्रायव्हेट पार्ट दाबणे हा 'हत्येचा प्रयत्न' नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

हा निर्णय देत न्यायालयाने आरोपीची शिक्षा देखील कमी केली.

Sudesh

कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा निर्णय दिला. दोन व्यक्तींच्या भांडणामध्ये जर एखाद्याने दुसऱ्याचे अंडकोष दाबले, तर त्याला 'हत्येचा प्रयत्न' म्हणता येणार नाही; असं न्यायालयाने स्पष्ट केलं. हा निर्णय देत न्यायालयाने आरोपीची शिक्षा देखील कमी केली.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, २०१० साली याचिकाकर्ता ओंकारप्पा आणि आरोपी परमेश्वरप्पा यांच्यात मोठं भांडण झालं होतं. यावेळी परमेश्वरप्पाने ओंकारप्पाचे अंडकोष दाबले होते. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात जखम झाली होती. ओंकारप्पाला यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्याठिकाणी ऑपरेशन करून त्याचे अंडकोष हटवण्यात आले होते.

एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या महत्त्वाच्या अंगाला गंभीर जखम केल्यामुळे, स्थानिक न्यायालयाने परमेश्वरप्पा याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये त्याने केलेलं कृत्य हे 'हत्येचा प्रयत्न' असल्याचं म्हटलं होतं. यानंतर परमेश्वरप्पा याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

हायकोर्टाने दिला दिलासा

उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती के. नटराजन यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. ते म्हणाले, की आरोपीने केलेलं कृत्य हे नक्कीच गंभीर आहे. मात्र, तो भांडायला येताना हत्येच्या उद्देशाने आला नव्हता. तसं असतं, तर तो आपल्या सोबत एखादे हत्यार घेऊन आला असता. आरोपीच्या कृत्यामुळे याचिकाकर्त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र, आरोपीचा तो उद्देश नव्हता.

आरोपीने केलेलं कृत्य हे हत्येच्या उद्देशाने केलं नव्हतं, हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा सात वर्षांवरून तीन वर्षं केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT