Doda Terrorist esakal
देश

जम्मू-काश्मीर : चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक; पोलिसांवर हल्ल्याचा होता कट

सकाळ डिजिटल टीम

दहशतवाद्याच्या ताब्यातून एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

श्रीनगर : सुरक्षा दलांसोबत संयुक्त कारवाई करून एका दहशतवाद्याला अटक करण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) यश आलंय. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं (Terrorists) नाव फरीद अहमद असं असून तो डोडा भागातील रहिवासी आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, डोडामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या ताब्यातून एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. शिवाय, दहशतवाद्याकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांवर हल्ल्याचा कट?

डोडामधील दहशतवाद्याच्या अटकेबाबत GreaterKashmir.com च्या वृत्तात पोलीस प्रवक्त्याचा हवाला देत म्हटलंय की, दहशतवादी सीमेपलीकडं राहणाऱ्या दहशतवादी कमांडरच्या संपर्कात होता. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव फरीद अहमद असं असल्याचं या बातमीत म्हटलंय. फरीद जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना लक्ष्य करू पाहत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोडा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय.

यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. 21 जून रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एका उपनिरीक्षकाच्या हत्येत सामील होता. चकमकीबाबत एसएसपी जेलानी वाणी यांनी सांगितलं की, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांची हत्या करणारा दहशतवादी माजिद पंपोर भागातील रहिवासी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT