देश

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार 

पीटीआय

सर्व यात्रेकरू गुजरातमधील; चालकाने नियमांचा भंग केल्याचा दावा 
श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर आज रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे, अनंतनाग पोलिसांनी ही माहिती दिली. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर "सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आला आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजून 20 मिनिटांनी अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पळून जाऊ लागले. पळून जाताना त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याच वेळी अमनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरूंची एक बस त्या भागात आली. दहशतवाद्यांनी त्या बसवरही बेछूट गोळीबार केला. ही बस सोनमर्ग होऊन येत होती. यात्रेसाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन बस चालकाने केल्याचा दावा पोलिसांनी केला. सायंकाळी सात वाजल्यानंतर यात्रेसाठीच्या कोणत्याही वाहनाने प्रवास करण्यास मज्जाव आहे. मात्र हा नियम चालकाने धुडकावल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हल्ल्याच्या घटनेनंतर या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 
अमरनआथ यात्रेला 29 जून रोजी सुरवात झाली आहे. हजारो भाविक रोज दर्शनासाठी जातात. सुमारे सव्वा लाख जणांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या बसगाड्यांची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या सर्व गाड्यांना सुरक्षाही पुरविण्यात येते. ज्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसची नोंदणी केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. या बसमध्ये गुजरातमधील 20 भाविक होते. 

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता. त्यानुसार सुरक्षाही वाढविण्यात आली होती. तब्बल 40 हजार जवानांची नेमणूक करण्यात आली होती. टेहळणीसाठी ड्रोनचही वापर यावेळी करण्यात येत होता. मात्र त्यानंतरही हल्ला झाल्यानंतर सुरक्षेतील त्रुटी पुढे आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajay-Atul Bandhu Song : पडद्यावर दोन सख्खे भाऊ, अन् आवाजही सख्ख्या भावांचाच! 'बंधू' चित्रपटात अजय-अतुलच्या सुरेल गीताने जिंकली रसिकांची मने

WhatsApp ग्रुपमध्ये आता 1500 मेंबर्सना मिळणार जागा; युजर्सची मोठी डोकेदुखी संपणार...

महागडं स्किनकेअर म्हणजे चांगलंच असतं असं नाही! प्रॉडक्ट घेताना त्वचारोगतज्ज्ञांप्रमाणे ‘या’ ५ गोष्टी तपासणं आहे महत्त्वाचं

Marathi News Live Updates : अंबरनाथमध्ये १२ व्या दिवशी ब्लिंकीटच्या रायडर्सचा संप सुरूच

SA vs BAN 1st Test: याला म्हणतात दणक्यात कमबॅक; १३० वर्षांपूर्वीचा विक्रम केला उद्ध्वस्त; कोण आहे Simon Harmer?

SCROLL FOR NEXT