japan earthquake esakal
देश

Japan Earthquake : ''जमीन हदरु लागली, आम्ही २८ व्या मजल्यावर होतो..'', जपानच्या भूकंपातून चित्रपट निर्माते राजामौली बचावले

Japan Earthquake : जपानमध्ये २१ मार्च रोजी ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. त्या दिवशी चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा जपानमध्ये होते. सुदैवाने दोघेही बचावले आहेत. ते दोघेही २८व्या मजल्यावर होते.

संतोष कानडे

Japan Earthquake : जपानमध्ये २१ मार्च रोजी ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. त्या दिवशी चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा जपानमध्ये होते. सुदैवाने दोघेही बचावले आहेत. ते दोघेही २८व्या मजल्यावर होते.

चित्रपट निर्माते एसएस राजामौली आणि त्यांचे चिरंजीव एसएस कार्तिकेय जपानमधील भूकंपात थोडक्यात बचावले आहेत. गुरुवार, दि. २१ मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ इतकी नोंदवली गेली आहे.

एसएस कार्तिकेय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या स्मार्ट वॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट दाखवला. त्यानंतर काही वेळातच ५.३ च्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्का बसले.

राजामौलींच्या मुलाने सांगितलं की, ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी ते आणि आरआरआरची संपूर्ण टीम इमारतीच्या २८व्या मजल्यावर होती. एसएस कार्तिकेय यांनी X वर फोटो शेअर केला. ते लिहितात, आत्ता जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला. आम्ही २८व्या फ्लोअरवर होतो. जमीन हळूहळू हलू लागली होती. हा भूकंप आहे, हे कळायला आम्हाला जरा वेळ लागला.

कार्तिकेय यांनी पुढे सांगितलं, मी मोठ्याने ओरडणारच होतो. परंतु आमच्या आजूबाजूला जे जपानी लोक होते त्यांना काहीही फरक पडला नाही. ते अशा पद्धतीने रियाक्ट झाले की, जणू पाऊस येणार आहे.

दरम्यान, जपानच्या हवामान विभागाने गुरुवारी माहिती दिली की, जपानच्या पूर्व भागातील इबाराकी येथे ५.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनुभवले गेले आहेत. देशात मागच्या काही वर्षांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी रोजी जपानमध्ये भूकंपाचे २१ धक्के बसले होते. ज्यातील एकाची तीव्रता ७.६ इतकी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT