Congress Marathon UP e sakal
देश

काँग्रेसच्या मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी? नेते म्हणतात 'हा तर...'

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : काँग्रेसने (Congress) उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly Uttar Pradesh) येथे ‘महिला मॅरेथॉन’ आयोजित केले होते. यामध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. कोरोनाच्या काळात इतकी गर्दी जमवल्याने काँग्रेसवर टीका देखील केली जात आहे.

मंगळवारी उत्तर प्रदेशातील बरेली येथे काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘महिला मॅरेथॉन’मध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 'लडकी हूं, लढ सकती हूं' या अंतर्गत प्रचार केला. याबाबत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी स्वतः घोषणा केली होती. त्याचनिमित्त हे मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शेकडो मुली धावताना दिसत आहे. मध्येच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थिनी खाली पडलेल्या दिसतात. तसेच ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही यामध्ये अनेकांच्या तोंडाला मास्क दिसले नाही.

''हा तर...'' -

या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या काँग्रेस नेत्या आणि बरेलीच्या माजी महापौर सुप्रिया आरोन यांनी सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही. "हजारो लोकांचा जमाव वैष्णोदेवीलाही गेला होता. त्याचे काय? बघा, ही खूप साहजिक गोष्ट आहे. हा मानवी स्वभाव आहे. या शाळकरी मुली आहेत. त्यांना रॅलीमध्ये थोडा वेळ धावायचे होते. पण, कोणाला काही दुखापत झाली असेल तर मी काँग्रेसच्या वतीने माफी मागतो, असे सुप्रिया आरोन म्हणाल्या

कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घ्यायच्या आहेत. तसेच राजकीय पक्षाने देखील प्रचार करताना कोरोना नियमांचे पालन करावे, असे बजावले आहे. पण, कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना राजकीय पक्ष लाखोंची गर्दी करत रॅली काढताना दिसत आहेत. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाकडून उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT