IMA 
देश

‘आयएएस’च्या धर्तीवर ‘आयएमएस’ सुरू करा

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचा तकलादूपणा जगजाहीर झाल्यानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आमूलाग्र सुधारणांच्या मागणीने जोर धरला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय वनसेवा (आयएफएस) या सनदी सेवांच्या धर्तीवर भारतीय वैद्यकीय सेवा (आयएमएस) सुरू केली जावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य प्रशासन आणि यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ असून प्रशासनातील नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे बदल घडवून आणणे शक्य असल्याचे संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

ही परीक्षा देणाऱ्यांसाठी मूलभूत पात्रता ही ‘एमबीबीएस’ची पदवी असावी असेही ‘आयएमए’कडून सूचित करण्यात आले आहे.  सध्या ‘आयएमए’ विविध पातळ्यांवर उत्साहाने काम करत असली तरीसुद्धा सरकारने निश्‍चितपणे काही सुधारणांचा आग्रह धरला पाहिजे. कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेले लोक आणि लोकांच्या चाचण्या गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा भार
या वैद्यकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे आरोग्यविषयक विविध जबाबदाऱ्या सोपविल्या जाव्यात. जिल्हा वैद्यकीय अधिकारी, विविध रोगांवर नियंत्रण ठेवणारे प्रकल्प अधिकारी, केंद्रीय मंत्रालये आणि राज्य आरोग्य विभागांतील विविध दर्जाचे सचिव आणि आरोग्यक्षेत्रातील अन्य विशेषाधिकारी यांच्या अनुषंगाने काही वेगळ्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या जाव्या असे ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी सांगितले.

‘आयएमए’च्या अन्य सूचना

  • कोरोना पश्‍चात नवे आरोग्य धोरण हवे
  • कोरोना नसणाऱ्या रुग्णांचे हित पहावे
  • सरकारने आरोग्यावरील खर्च वाढवावा
  • संपूर्ण देशासाठी एकच मार्गदर्शक सूचना हवी
  • पायाभूत सुविधांच्या विकासावर भर हवा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT