देश

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

दोन महिन्यांपूर्वीच सरकारनं या कायद्याच्या अंमलबाजवणीचं नोटिफिकेशन काढलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशभरात लोकसभा निवडणुका सुरु असतानाच नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात १४ लोकांना ही प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या नव्या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र कोणाला मिळालं? जाणून घ्या. (Start of distribution of CAA Certificates from the union government who got first certificate need to know)

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीएएची प्रमाणपत्रांचं वाटप सुरु झालं असून बुधवारी पहिल्या टप्प्यात १४ जणांना ही प्रमाणपत्रे देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत या प्रमाणपत्रांचं वाटप केलं. दोन महिन्यांपूर्वी गृहमंत्रालयानं सीएए कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचं नोटिफिकेशन काढलं होतं. प्रमाणपत्रे वाटप झाल्यानंतर गृहसचिवांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं. तसेच या कायद्यातील महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या.

सन २०१९ मध्ये हा कायदा संसदेत मंजूर झाला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. या कायद्यामुळं पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या भारताशेजारील मुस्लिम राष्ट्रांमधून जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक भारतात दाखल झाले आहेत. त्यांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाणार आहे. यामध्ये हे लोक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात वास्तव्यास असणं आवश्यक आहे. या कायद्यात ही देखील तरतूद आहे की, जर यातील कोणत्या नियमाचं उल्लंघन झालं तर ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाच्या कार्डधारकांची नोंदणी रद्द केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT