mahindra_modi 
देश

"महाराष्ट्रात सर्वांसाठी लसीकरण सुरु करा"; आनंद महिंद्रांची पंतप्रधानांना विनंती

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी काळजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची विनंती केली आहे. महिंद्रा यांनी एका ट्विटवर भाष्य करताना पीएमओकडे ही मागणी केली. 

महिंद्रा म्हणाले, "महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरणाची पात्रता वाढवून सर्वांसाठी लसीकरणाला परवानगी द्यावी. त्याचबरोबर लसीकरण मोहीम वेगानं राबवण्याकरता यामध्ये खासगी क्षेत्रालाही भागीदार करुन घ्यावं.

लॉकडाउनला विरोध 

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी याला विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन न करण्याचं आवाहन करताना त्यांनी म्हटलं, "उद्धवजी लॉकडाउनचा सर्वात जास्त फटका गरीब, स्थलांतरित कामगार आणि छोट्या उद्योगांना बसतो. यापूर्वी झालेल्या मूळ लॉकडाउनच्या काळात हॉस्पिटल्स आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपण खर्च केला, आता या सुविधा पुनरुज्जीवित करण्यावर आणि मृत्यूदर कमी करण्यावर भर देऊयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाने कुपवाड हादरले! मनीषानंतर दोनच दिवसांत मोहन यांचाही मृत्यू; संशयित हल्लेखोर फरिद शेखला अटक, नेमके काय घडले?

Philippines School Shooting : वर्गात बंदूक घेऊन घुसला विद्यार्थी; मित्रावर झाडल्या गोळ्या, नंतर स्वतःलाही संपवलं, घटनेचा LIVE VIDEO व्हायरल

IND vs SL 1st Test: श्रीलंकेला धक्का... सामना सुरू असताना स्टार फलंदाजाला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल; नेमके काय घडले?

Marathi News Updates : पुण्यात आदिवासी विद्यार्थी आश्रमगृहात विद्यार्थ्यांच आमरण उपोषण

Babar Azam: बाबर आझमने मैदान सोडले! इंग्लंडचा सामना करण्यापूर्वीच माघार घेतली, आयत्यावेळी पाकिस्तान कर्णधाराच्या शोधात

SCROLL FOR NEXT