

Latest Marathi News Live Update
esakal
भंडारा - शहरातील मेंढा भागात असलेल्या नेहरू गार्डनजवळ १६ वर्षीय शाळकरी मुलाची गुप्तीने वार करत हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. हंश येरकडे (रा. भंडारा) असे मृताचे नाव असून, मारेकरी त्याचा मित्रच असल्याची माहिती आहे.