hyderabad ramanujacharya 
देश

Statue Of Equality : 120 किलो सोन्याची मूर्ती आणि 1 हजार कोटी रुपये खर्चून उभा राहणार मंदिर

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद - भारतातील महान संतांपैकी एक असलेल्या रामानुजाचार्य यांचे सहस्राब्दी वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्मरणार्थ हैदराबादमधील श्रीरामनगर जीवा आश्रमाच्या जवळ 216 फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं नाव देण्यात आलं आहे. ही मूर्ती अष्टधातूंपासून तयार केली आहे.

हैदराबाद इथं रामानुजाचार्य यांच भव्य असं मंदिर उभारलं जात आहे. यासाठीचा एकूण खर्च जवळपास 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रामानुजाचार्य यांची आणखी एक मूर्ती 120 किलो सोन्यापासून तयार केली असून ती मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवली जाणार आहे. रामानुजाचार्य यांची सर्वात मोठी मूर्ती चीनमध्ये तयार करण्यात आली असून त्याचा खर्च 400 कोटी रुपये इतका आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झाली आहे. 

एक हजार वर्षापूर्वी रामानुजाचार्य स्वामी यांनी भारतीय समाजात बदलासाठी चळवळ उभा केली. त्यावेळी समाजात अस्पृश्यता, कट्टरता होती. ते पहिली व्यक्ती होते ज्यांनी मागास वर्गाला मंदिरात प्रवेश दिला होता. सनातन परंपरेतील कोणत्याही संताचे इतके भव्य मंदिर उभारलेलं नाही. रामानुजाचार्य स्वामी पहिले असे संत आहेत ज्यांची इतकी मोठी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. 

स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि रामानुजाचार्य मंदिर 45 एकर जमीनीवर उभारलं जात आहे. मंदिराच्या बांधकामाला 2014 मध्ये सुरुवात झाली आहे. मंदिराची मुख्य इमारत ही जवळपास दीड लाख चौरस फूटा क्षेत्रात असून 58 फूट उंच आहे. यावर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे. या मंदिरात जवळपास 25 कोटी रुपये खर्चून संगीतमय कारंजे लावण्यात आले आहेत. यातून स्वामी रामानुजाचार्य यांची गाथा ऐकवण्यात येते. 

वैष्णव संत रामानुजाचार्य यांचा जन्म सन 1017 मध्ये तामिळनाडुत झाला होता. ते विशिष्टाद्वैत वेदांतेचे प्रवर्तक होते. कांची इथं त्यांनी आलवार यमुनाचार्यजी यांच्याकडून दीक्षा घेतली होती. भारतभ्रमण करून वेदांत आणि वैष्णव धर्माचा प्रचार केला होता. रामानुज यांनी भक्तीचा अर्थ पूजा-पाठ, भजन-कीर्तन नाही तर ध्यान करणं, देवाची प्रार्थना करणं आहे असा सांगितला होता. इसवी सन 1137 मध्ये त्यांचे देहावसान झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT