statue of Netaji Subhash Chandra Bose will erected at India Gate PM Narendra Modi sakal
देश

‘इंडिया गेट’वर उभारणार नेताजींचा पुतळा

पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन: देशविदेशातील बोस कुटुंबीय हजर राहणार

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भव्य पुतळा इंडिया गेटवर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनावरण समारंभाला मुहूर्त मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सप्टेंबरला (गुरुवार) नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. नेताजींचे देशविदेशातील कुटुंबीयही यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा पुतळा देशाच्या भारतीयांच्या नेताजींबद्दलच्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल, अशी भावना पंतप्रधानांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती हलविल्यावर सध्याच्या रिकाम्या चबुतऱ्याला नेताजींचा हा भव्य ग्रॅनाईटचा पुतळा बसल्यावर वेगळेच सौंदर्य प्राप्त होणार आहे.

सध्या इंडिया गेटवर नेताजींचा हॉलोग्रामचा पुतळा संध्याकाळी दिसत होता. पण त्यावरूनही टीका सुरू झाल्यावर तो प्रकल्पही बंद करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. प्रस्तावित ग्रॅनाइटचा पुतळा याच होलोग्राम पुतळ्याची जागा घेणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार होलोग्राम पुतळा तांत्रिक बिघाडांमुळे काढून टाकण्यात आला आहे.

म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी नेताजींचा हा ३० फूट उंचीचा पुतळा उभारला आहे. नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरीचे संचालक, प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक यांचाही या पुतळ्याच्या निर्मितीत सहभाग आहे. त्यांनीच यापूर्वी केदारनाथ येथील आदि शंकराचार्यांचा १२ फूट उंचीचा पुतळा तयार केला होता. इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती सरकारने राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये स्थलांतरित केली. त्यानंतर येथे नेताजींचा ३० फूट उंचीचा भव्य पुतळा बसविण्याच्या योजनेवर काम सुरू झाले.

दरम्यानच्या काळात दुर्गापूजेनंतर (नवरात्र) या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यानंतर नवीन तारीख आली त्यानुसार नेताजींनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी १९४३ मध्ये ज्या दिवशी ‘आझाद हिंद सरकार’ आणि ’आझाद हिंद फौज’ स्थापन केली होती त्या २१ सप्टेंबरच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नंतर जाहीर करण्यात आले. आता ८ सप्टेंबरची तारीख निश्चित झाली आहे. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते राजपथाच्या दोन्ही बाजूला सेंट्रल व्हिस्टा योजनेत उभारण्यात आलेली काही उद्याने, कारंजी यांचेही उद्घाटन करण्याचे नियोजन बांधकाम विभागाने केले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे मूर्तिमंत उत्कटता, नेताजी म्हणजे अदम्य धैर्य. त्यांचे ते कणखर व्यक्तिमत्त्व या पुतळ्यातून हुबेहूब समोर उभे राहावे असे आपले प्रयत्न आहेत.

-अरुण योगीराज, शिल्पकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT