Statue of Unity 
देश

...तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे; 'या' नेत्याने केली मागणी

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे, अशी मागणी गुजरातमधील भारतीय ट्रायबल पार्टीचे प्रमुख आणि आदिवासी नेता छोटू वसावा यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, जर भाजप चिनी सामानाचा खरंच विरोध करत असेल तर आधी मेड इन चायना असलेला स्टॅट्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे, असे त्यांनी म्हटलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारत-चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत असून चिनी सामानांवर बहिष्काराची मागणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसावा यांनी भाजपवर टीका करत ही मागणी केली आहे. चीन आपला शत्रू आहे. जर भाजपचा चीनला खरंच विरोध असेल तर पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ युनिटी हटावावा, कारण तो मेड इन चायना आहे. चीनचा विरोध करायचा असेल तर सुरूवात स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून करायला हवी, असं छोटू वसावा यांनी म्हटलं आहे. 
--------------
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार
--------------
तसेच, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील आदिवासी लोकांच्या जमिनी घेण्यासाठी सरकार बळजबरी करत असल्याचा आरोपही वसावा यांनी केला आहे. गुजरात सरकार विकासाच्या नावाखाली केवाडियामधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी बळजबरी करत असून केवाडियाच्या परिसरातील ६-७ गावांमधील जवळपास २५ हजार हेक्टर जमीन बळजबरी ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील जमीन अमेरिकी आणि चिनी कंपन्यांना देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही अनेक नेत्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या स्थापनेपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गुजरातच्या नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन या पुतळयाला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. आता मात्र, तो मेड इन चायना असल्याचे पुढे करत छोटू वसावा यांनी भाजपवर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT