Vande Bharat Express esakal
देश

Narendra Modi : उद्घाटनापूर्वीच 'वंदे भारत एक्सप्रेस'वर पुन्हा दगडफेक; नव्या ट्रेनला मोदी दाखवणार होते हिरवा झेंडा

यापूर्वी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केल्यापासून 'वंदे भारत एक्सप्रेस'वर दगडफेकीची ही पहिलीच घटना नाहीये.

सकाळ डिजिटल टीम

कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला नव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

कोलकाता : 'वंदे भारत एक्सप्रेस'वर (Vande Bharat Express) दगडफेकीची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वी कोलकात्यात (Kolkata) या ट्रेनवर दगडफेक झालीये. हावडा-जलपाईगुडी वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांनी मालदा इथं ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.

मालदा शहरापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

विशेष म्हणजे, रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आलीये. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेनं आतापर्यंत देशात सुमारे 7 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. या वर्षी म्हणजेच, 2023 मध्ये सरकार देशात एकूण 75 नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करणार आहे.

भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांना अधिक सोयी आणि सुविधा देण्यासाठी 'वंदे भारत'च्या तिसऱ्या आवृत्तीच्या डिझाइनवर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रेल्वे (Indian Railway) वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर क्लास जोडण्याची तयारी करत आहे, त्यामुळं प्रवाशांचा लांबचा प्रवास सुकर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT