Kota News esakal
देश

Kota News: 'कोटा फॅक्टरी' की 'सुसाईड फॅक्टरी', आता नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच! आता नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोटामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रशासन कितीही प्रयत्न करत असले तरी मृत्यूचे प्रमाण थांबले नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा कोचिंगच्या आणखी एका विद्यार्थ्यीनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. कोचिंगची विद्यार्थ्यीनी प्रियम सिंह मऊ यूपीची रहिवासी होती आणि कोटामध्ये NEET ची तयारी करत होती.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियम सिंह शनिवारी सकाळी कोटाच्या विज्ञान नगर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोचिंगसाठी गेली होती. कोचिंग दरम्यानच तिने सल्फास हे विषारी पदार्थ सेवन केल्याचे सांगितले जात आहे. तेव्हापासून तिची प्रकृती ढासळू लागली आणि सतत उलट्या होत होत्या. विषारी द्रव्य पोटात गेल्याचे निदर्शनास येताच तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.(Latest Marathi News)

पोलिसांनी कुटुंबीयांना कळवले असून, ते आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तसेच, ही विद्यार्थीनी ज्या वसतिगृहात राहत होती, त्या खोलीचीही चौकशी केली जाईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, विषारी द्रव्य प्राशन केल्यानेही मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

याच महिन्यात, NEET कोचिंगची विद्यार्थिनी, 16 वर्षीय रिचा सिन्हा हिने गळफास लावून आत्महत्या केली होती.(Latest Marathi News)

सध्या कोटामध्ये सुमारे दोन लाख मुले राहत आहेत आणि शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन, पोलिस प्रशासन, हेल्प लाइन, कोचिंग इन्स्टिट्यूटसह समुपदेशक अनेक प्रकारची काळजी घेतात. त्याचबरोबर वसतिगृह चालक आणि वसतिगृह संघटनांबरोबरच स्वयंसेवी संस्थाही कार्यरत आहेत. त्यानंतरही आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. कोटामध्ये दोन लाख मुलांसाठी 4 हजार वसतिगृहे आहेत, तर 50 हजार मुले पीजीमध्ये राहतात.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT