student-suddenly-died-due-to-heart-attack-during-school-prayer in mp 
देश

शाळेतील प्रार्थनेदरम्यान विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका, बेशुद्ध पडला अन् काही मिनिटांतच...

Sandip Kapde

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात अशी घटना घडली की संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. महर्षी विद्या मंदिर शाळेतील प्रार्थना सभेदरम्यान एक विद्यार्थी बेशुद्ध होऊन खाली पडला. अवघ्या काही मिनिटांत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

हृदयविकाराचा झटका आल्याने विद्यार्थी खाली पडला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला मात्र अवघ्या काही मिनिटांत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत सार्थक टिकरिया हा छतरपूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी आलोक टिकरिया यांचा मुलगा होता.

नातेवाईकांनी सांगितले की, मृत सार्थक टिकरिया हा नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता शाळेत गेला होता. शाळेतील संमेलनादरम्यान तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यांना शाळेतून फोन आला. तो शाळेत पोहोचेपर्यंत शिक्षकांनी सीपीआरद्वारे त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला मात्र सार्थकचा मृत्यू झाला.

कुटुंबीय शाळेत पोहोचल्यावर त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणावर जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर म्हणतात की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाकडे फक्त १० मिनिटांचा वेळ असतो. अशा परिस्थितीत सार्थकला आणण्यास उशीर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सीपीआरही (Cardiopulmonary Resuscitation) नीट दिला गेला नाही. नाहीतर रुग्णालयात आणेपर्यंत त्याला वाचवता आले असते. (Latest Marathi News)

 नेत्रदान करण्याचा निर्णय -

दहावीत शिकणाऱ्या सार्थकचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सार्थकच्या वडिलांनी नेत्रदानासाठी सद्गुरू नेत्र रुग्णालयाला कळवले आणि सोमवारी दुपारी ३ वाजता रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. सार्थकच्या डोळ्यातून आता एका अंध व्यक्तीला नवजीवन मिळणार असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT