ugc 
देश

यूजीसीच्या निर्णयानंतर #studentslivematters हॅशटॅग ट्रेंड; विद्यार्थ्यांनी शेअर केले मजेशीर मीम्स

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना हा निर्णय घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्विटरवर #studentslivematters हा हॅशटॅग ट्वेंड होत आहे. अमेरिकेत सुरु असलेल्या #blacklivesmatters च्या धर्तीवर हा हॅशटॅग ट्वेंड करण्यात येत आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग किंवा यूजीसीने विद्यापीठांना ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची अनुमती दिली आहे. मात्र, यूजीसीचा हा निर्णय अनेक विद्यार्थ्यांच्या पचनी पडला नसल्याचं दिसत आहे. विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर आघाडी उघडी आहे. अनेकांनी सोशल मीडिच्या माध्यमांतून आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी मीम्स आणि विनोद शेअर करत आयोगाच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. 

आयोगाच्या निर्णयानुसार, कॉलेज आणि विद्यापीठांना सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सत्र घेऊन अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी लागणार आहे. यापूर्वी यूसीजीने परीक्षा घेणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, काहींनी आयोग्याच्या या  विचारावर टीका केली होती. त्यामुळे आयोगाने पुनर्विचार करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या प्रगतीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यूजीसीच्या निर्णयाचा परिणाम देशभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकांवर पडणार आहे. विशेष करुन गुजरात आणि कर्नाटक ही राज्य आयोगाच्या निर्णयाची वाट पाहात होती. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, ओडिसा आणि मध्य प्रदेश या राज्यांनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. आता या राज्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागणार आहे.

शैक्षणिक मुल्यमापन हे अत्यंत महत्वाचे आहे. परीक्षांमधील कामगिरी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि समाधान देत असते. तसेच जागतिक पातळीवर संधी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापन व्हायला हवे, असं विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटलं आहे. कशापद्धतीने परीक्षा घेतल्या जाव्यात याबाबत आयोगाने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT