स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेलं एक लहानसं दुकान आज देशातलं एक मोठं ब्रँड बनलं आहे. होय! अनेकांना ब्रँड म्हणून माहिती असलेलं पण स्वातंत्र्यपूर्व काळातील लहानसं दुकान म्हणून ठाऊक नसलेलं तुम्हा आम्हा सर्वांच्या पसंतीचं ठिकाण ज्याचं नाव आहे 'हल्दीराम'. एका लहानशा दुकानापासून सुरू झालेल्या हल्दीरामचा ब्रँड आज संपूर्ण देशात ओळखला जातो. 'कार्यक्रमात गोड तोंड करायचं असल्यास हल्दीरामची मिठाई विसरून चालत नाही', असे म्हणणारे ग्राहक हल्दीरामच्या मिठाईचे जबरे फॅन आहेत. अनेकांना हल्दीरामच्या प्रसिद्ध ब्रँडची सक्सेस स्टोरी माहिती नाही. प्रसिद्ध ब्रँड हल्दीरामची कहाणी खास आहे. (Haldiram Success Story)
हल्दीरामची सुरूवात बीकानेरच्या एका किराणादुकान चालवणाऱ्या कुटुंबातून झाली होती. तनसुखदास यांच्या कष्टावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ होता. तनसुखदास यांचा मुलगा भीखाराम त्यावेळी नव्या कामाच्या शोधात होता. दरम्यान भीखाराम यांनी त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावावर एक छोटं दुकान सुरू केलं. त्या काळी बीकानेरमध्ये भूजिया नमकीनचा स्वाद लोकांना फार आवडायचा. म्हणून त्यांनी हाच पदार्थ विकायचे ठरवले. भीखाराम भूजिया बनवण्याची कला त्यांची बहिण बीखी बाई यांच्या कडून शिकले होते. मात्र या सगळ्यातून त्यांच्या कुटुंबाचं पोट भरेल एवढेच पैसे त्यांना मिळायचे.
मात्र १९०८ मध्ये भीखाराम यांचा नातू गंगा बिशन अग्रवाल यांचा जन्म झाला आणि एक नवं पर्व सुरू झालं. त्यांची आई त्यांना प्रेमाने 'हल्दीराम' म्हणायची. जेव्हा हल्दीराम यांचा जन्म झाला तेव्हा भीखाराम यांचं वय फक्त ३३ वर्षे एवढं होतं. भीखाराम यांचं लग्न फार कमी वयात झालं होतं. त्यांच्या नातवानेही कमी वयातच त्यांच्या दुकांनात त्यांना मदत करायला सुरूवात केली. वयाच्या ११व्या वर्षीच हल्दीराम यांचं लग्न झालं. लग्नानंतर जबाबदाऱ्या तर वाढल्याच पण त्याचबरोबर त्यांच्या दुकानाला आणखी कसं वाढवता येईल हा विचार त्यांच्या मनात सुरू होता. त्यांच्या कुटुंबातही या दरम्यान काही वाद सुरू होते. त्यामुळे ते कुटुंबापासून वेगळे झाले. आणि १९३७ मध्ये त्यांनी त्यांचं एक लहानसं नाश्त्याचं दुकान उघडलं. या दुकानात त्यांनी शेव विकण्यास सुरूवात केली.
शेवची चव लोकांना अधीक चांगली कशी देता येईल यासाठी हल्दीराम सतत काहीना काही प्रयोग करत राहायचे. आणि त्यांच्या प्रयत्नांना भारी यश मिळाले. त्यांचे शेव घेण्यासाठी त्यांच्या दुकानाबाहेर रांग लागायची. घराघरात त्यांच्या बनवलेल्या शेवांची मागणी वाढली तेव्हा त्यांनी आणखी लोकप्रियता वाढवण्यासाठी बीकानेरच्या प्रसिद्ध राजा डूंगर सिंग यांचं नाव देऊन दुकानातील शेव पदार्थास 'डूंगर शेव' असे नाव दिले.
१९४१ मध्ये जेव्हा हल्दीरामच्या नमकीन शेवांची चव घरोघरी पोहोचली तेव्हा त्यांचा व्यापार वाढवण्याकडे त्यांचे लक्ष लागले होते. कोलकाताच्या एका लग्नात त्यांच्या दुकानातील नमकीनची चव सगळ्यांना फार आवडली आणि त्यांनी कोलकातामध्ये दुकान उघडण्याचं ठरवलं. हल्दीरामची एक ब्रांच कोलकातामध्ये उघडण्यात आली. त्यांनतर नागपूर आणि नंतर दिल्लीमध्येदखील त्यांचा हा व्यवसाय पोहोचला. १९७० मध्ये नागपूरमध्ये हल्दीरामचं पहिलं स्टोअर उघडण्यात आलं. यानंतर संपूर्ण देशात हल्दीरामचे प्रोडक्ट्स विकल्या जाऊ लागले. त्यांच्या प्रोडक्ट्सच्या चवीने त्यांची कंपनी देशातील नंबर वन ब्रँड ठरली.
आज देशातील एकूण ८० देशांमध्ये हल्दीरामच्या प्रोडक्ट्सची निर्यात केली जाते. २०१५ मध्ये मात्र अमेरिकेच्या एका वक्तव्याने हल्दीरामला मोठा फटका बसला होता. हल्दीराम त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये किटकनाशक वापरतात असे म्हणत अमेरिकेने हल्दीरामच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र यामुळे हल्दीरामच्या व्यापारावर त्याचा काही खास परिणाम झाला नाही. संपूर्ण जगभऱ्यात त्यांच्या ब्रँडची आज एक वेगळी ओळख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.