देश

अवकाश भरारीची यशाने सांगता;‘इस्रो’च्या ‘सीएमएस-०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 

पीटीआय

श्रीहरीकोटा (आंध्रप्रदेश) - भारताने ‘सीएमएस-०१’ दूरसंचार उपग्रहाचे आज ध्रुवीय प्रक्षेपकाच्या माध्यमातून येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केले. कोरोनाकाळातील हे दुसरे प्रक्षेपण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘पीएसएलव्ही-सी५०’ या प्रक्षेपकाने अवकाशात झेप घेतल्यानंतर वीस मिनिटांनी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. आज दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.‘सीएमएस-०१’ हा इस्रोचा ४२ वा संवाद उपग्रह आहे. तो अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांना देखील आपल्या कवेमध्ये घेईल. भविष्यात हा उपग्रह सी बँड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून सेवा देऊ शकेल. या उपग्रहाचा जीवनकाळ हा सात वर्षांचा असेही इस्रोकडून सांगण्यात आले. 

‘जीसॅट-१२’ जागा घेणार 
हा उपग्रह अंतराळातील ‘जीसॅट-१२’ या उपग्रहाची जागा घेईल. पूर्वीच्या उपग्रहाचे वजन १ हजार ४१० एवढे वजन होते. या उपग्रहाला ११ जुलै २०११ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. त्याचा जीवनकाळ हा आठ वर्षांचा होता. आजची मोहीम ही इस्रोची चालू वर्षातील शेवटची मोहीम होती. 

सध्या हा उपग्रह खूप चांगल्यारितीने काम करतो आहे. पुढील चार दिवसांमध्ये तो आपली निर्धारित जागा घेईल. कोरोनाच्या काळात देखील आमच्या टीमने सुरक्षेची काळजी घेऊन ही मोहीम फत्ते केली आहे. 
- के. सिवान, अध्यक्ष इस्रो 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT