Suchana Seth Case esakal
देश

Suchana Seth Case : दोन तास पतीला ताटकळत ठेवलं, मुलाचा खूनाच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सूचना सेठबाबत नवीन माहिती

स्वतःच्या मुलाचा खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सूचना सेठ हिच्याबाबत नवीन माहिती

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : स्वतःच्या मुलाचा खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या सूचना सेठ हिच्याबाबत नवीन माहिती पुढे येत आहे. विभक्त राहत असलेला पती पी.आर. वेंकट रमण याला फोन करून मुलाला भेटण्यासाठी रविवारी (ता.७) येण्यास सांगितले होते. तिने सांगितलेल्या जागी दोन तास वाट पाहूनही वेंकट रमणला मुलगा भेटला नाही.

स्टार्टअप कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी सूचना सेठ हिने गोव्यातील हॉटेलमध्ये मुलाचा खून करून मृतदेह बॅगेत भरून बंगळूरला जात असताना पोलिसांनी तिला अटक केली. पती व ती विभक्त राहत असून न्यायालयाने मुलाला भेटण्याची परवानगी वेंकट रमणला दिलेली आहे. पण सूचनाला त्याला विरोध होता.

तरी तिने ७ जानेवारीला मुलाला भेटण्याबाबत वेंकट रमणला फोन करून कळविले होते. ठरल्यानुसार तो आला होता. पण दोन तास वाट पाहूनही मुलगा न आल्याने त्याने सूचनाला फोन केला, संदेश पाठविले, पण तिच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर तो जाकार्ताला निघून गेला. वेंकट रमण यांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. सूचनाने ६ ते १० जानेवारी या कालावधीसाठी गोव्यातील आरक्षण असल्याने मुलाला भेटण्याची परवानगी देण्याची शक्यता नव्हती, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT