Suchana Seth Case Esakal
देश

Suchana Seth Case: मुलगा वडिलांजवळ जाईल या भीतीने खून? सूचना सेठ प्रकरणात पतीच्या वकिलांनी व्यक्त केली शक्यता

Suchana Seth Case: सूचना सेठ प्रकरणात पतीच्या वकिलांनी मुलगा वडिलांजवळ जाईल या भीतीने खून केला असल्याची शक्यता व्यक्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

म्हापसा (गोवा): संशयित सूचना सेठ व तिचा पती व्यंकटरमण यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. दोघांच्या घटस्फोटासाठी बंगळूरमध्ये सुनावणी सुरू होती. याव्यतिरिक्त चिन्मयच्या कस्टडीसाठी दोघांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती. अशातच, बंगळूरच्या कुटुंब न्यायालयाने व्यंकटरमण यांना चिन्मयला भेटण्यासाठी परवानगी दिली होती आणि कदाचित हाच मुद्दा सूचनाला खटकला असावा आणि तिने चिन्मयची हत्या केली असावी, अशी शक्यता व्यकंटरमण यांच्या बाजूने वकील अ‍ॅड. अझर मीर यांनी शनिवारी माध्यमांसमोर व्यक्त केली.

अ‍ॅड. अझर मीर पुढे म्हणाले की, सूचना यांना राग होताच, तर तो त्यांनी व्यंकटारमण यांच्यावर काढायचा होता. चिन्मयचा जीव घेऊन कुणाचे बरे झाले! राहिला प्रश्न, न्यायाची तर आम्हाला कुठल्याच न्यायाची अपेक्षा नाही. कारण, चिन्मय या जगात नाही. चिन्मयसाठी व्यंकटरमण यांनी स्वतःचा जीव दिला असता. राहिला प्रश्न सूचना हिला शिक्षा होऊ अथवा नाही... किंवा सूचना यांना पोलिस कोठडीतच ठेवल्यानेसुद्धा व्यंकटरमण यांना आता कोणताच फरक पडत नाही. कारण, व्यंकटरमण यांनी त्यांचे सर्वस्व असलेला चिन्मय गमावला असल्याचा दावा अ‍ॅड. मिर यांनी केला.

व्यकंटरमण हे सूचना सेठ यांचा छळ करायचे, अशा काही बातम्या समोर येताहेत, असे विचारले असता अ‍ॅड. अझर मिर म्हणाले की, या बातम्यांमध्ये तथ्य नाही, तसेच दोघांमध्ये नक्की काय चालले होते ते मला माहिती नाही. आणि असे काही असते तर सूचना यांनी चिन्मयला का ठार मारले? मुळात चिन्मय सूचना यांचा छळ करत होता का? राग काढायचा होता तर व्यकंटरमण यांच्यावर सूचना हिने काढायचा! त्या निष्पाप चिमुकल्याचा या साऱ्यात काय दोष होता, असे म्हणत अ‍ॅड. मीर यांनी व्यकंटरमण यांची बाजू मांडली.

मुळात चिन्मयचा खूनाचा आरोप असणारी व्यक्ती ही पोलिस कोठडीत आहे, तर दुसरी व्यक्ती (व्यंकटरमण) यांनी चिन्मयच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

रिमांडसाठी बाल न्यायालयात हजेरी

येत्या सोमवारी (ता.१५) कळंगुट पोलिस सूचना हिला बाल न्यायालयात पुढील रिमांडसाठी हजर करतील. सूचना हिचा पोलिस रिमांड आज रविवारी (ता.१४) संपतो. तसेच, कळंगुट पोलिस व्यंकटरमण यांना सोमवारी गोमेकॉत डीएनए चाचणीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan: आज शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2,000 रुपये! किती वाजता जमा होणार 24वा हप्ता? पैसे आले की नाही? मोबाईलवर असे चेक करा

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध चौथा T20 आज; अभिषेक शर्मा पुन्हा चर्चेत, Playing 11 मध्ये मोठे बदल होणार? कोण IN, कोण OUT; सामना कुठे पाहाल?

Maharashtra SIR Deadline : महाराष्ट्रात SIR ची मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढवली; सुप्रीम कोर्टाने फटकारताच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : जोरदार बर्फवृष्टीमुळे केदारनाथमधील तापमानात मोठी घट

“असं अचानक कोणाला काढून टाकणं योग्य नाही”; लीना-मंगेश प्रकरणावर वंदना गुप्तेंनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाल्या...'आजकालची मुलं...'

SCROLL FOR NEXT