Goa Murder Case Update eSakal
देश

Goa Murder Case : सूचनाने लिहिलेल्या चिठ्ठीत नवी माहिती समोर, आज पोलीस रिक्रिएट करणार संपूर्ण घटनाक्रम..

गोवा हत्याकांड प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. सूचना सेठ या बंगळुरूमधील स्टार्टअप कंपनीच्या सीईओने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केला होता.

Sudesh

CEO Murders 4 Year Old Son : गोवा हत्याकांड प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. सूचना सेठ या बंगळुरूमधील स्टार्टअप कंपनीच्या सीईओने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केला होता. गोव्यातील एका हॉटेल रुममध्ये तिने हा खून केला होता. या हॉटेल रुममध्ये पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे.

या चिठ्ठीमध्ये सूचनाने (Suchana Seth) लिहिलं होतं, की "कोर्टाने आपल्या पतीला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे, हे मला सहन होत नाही". इंडिया टुडेने याबाबत रिपोर्ट दिला आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी सील केली असून, ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे. सूचनाचं हस्ताक्षर आणि चिठ्ठीवरील हस्ताक्षर मॅच होतं का हे तपासलं जाणार आहे.

आज सीन करणार रिक्रिएट

सूचना सेठला आज (शुक्रवार, 12 जानेवारी) पोलीस गोव्यातील हॉटेलमध्ये पुन्हा घेऊन जाणार आहेत. याठिकाणी संपूर्ण घटनाक्रम रीक्रिएट केला जाईल. केसच्या तपासासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. (Startup CEO Kills Son)

सूचना आणि तिचा पती वेंकट रमण यांची बंगळुरूमध्येच ओळख झाली होती. 2010 साली या दोघांचं लग्न झालं होतं. 2019 साली सूचनाच्या मुलाचा जन्म झाला होता. मात्र त्यानंतर एकाच वर्षात या दोघांचा घटस्फोट झाला होता. यानंतर मुलगा सूचनासोबतच राहत होता. कोर्टाने वेंकटला फक्त दर रविवारी मुलाला भेटता येईल असा आदेश दिला होता. (Suchana Seth Husband)

मीडिया रिपोर्ट्समध्ये असं समोर आलं आहे, की सूचनाला कोर्टाचा हा आदेश आवडला नव्हता. तिला आपल्या एक्स पतीकडून पोटगी म्हणून दरमहा अडीच लाख रुपये मिळत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT