BharatPe CEO 
देश

BharatPe चे सीईओ सुहेल समीर यांचा राजीनामा; काय आहे कारण?

भारत पेचे सीईओ सुहेल समीर यांनी राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारत पेचे सीईओ सुहेल समीर यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी, समीर भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. (Suhail Sameer To Step Down As BharatPe CEO BharatPe appoints Nalin Negi as interim CEO)

भारत पेने यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुहेल समीर हे 7 जानेवारीपर्यंत धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत राहतील. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी सर्व भागीदारांच्या संमतीने नलिन नेगी यांना अंतरिम सीईओ म्हणून घेण्यात आले आहे.

वादाच्या भोवऱ्यात कंपनी

चार वर्षे जुनी कंपनी 2022 च्या सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे. जेव्हा संस्थापक अशनीर ग्रोव्हरवर अयोग्य भाषा वापरल्याचा आणि कोटक ग्रुपच्या कर्मचाऱ्याला त्याच्या आणि त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हरला Nykaa IPO साठी निधी न मिळाल्याबद्दल धमकावल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर ग्रोव्हर आणि माधुरी जैन ग्रोव्हर यांना निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली कंपनीतून हाकलून देण्यात आले.

काय होता वाद?

भारतपेचे माजी संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीच्या बोर्डाला पत्र लिहून मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुहेल समीर यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. ईटीच्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये काही प्रकरणांवरून वाद वाढला होता. त्या काळात सुहेल समीरला हटवण्यास मंडळाने नकार दिला असला तरी. नंतर काही आरोपांवर ग्रोव्हर यांना रजेवर पाठवण्यात आले. यानंतर त्यांनी भारतपे सोडले.

सहसंस्थापकांनीही नोकरी सोडली

ग्रोव्हरच्या बाहेर पडल्यानंतर सह-संस्थापक भाविक कोलाडिया यांनी एप्रिलमध्ये कंपनी सोडली. वर्षभरात कंपनीतून मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यात आले आहेत. वरिष्ठ पातळीवरील बहुतांश अधिकारी कंपनी सोडून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT