Suicide Marathi News Suicide Marathi News
देश

चार लग्नं, एकीचा मृत्यू तर तिघींचे पलायन; त्रस्त नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ डिजिटल टीम

उदयपूर : प्रेमात धोका मिळाल्यानंतर काही युवक-युवती आत्महत्या करतात. आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असतात. कोण कधी आत्महत्या (Suicide) करेल हे सांगता येत नाही. अशीच एका आत्महत्येची घटना राजस्थानमधील उदयपूर येथून समोर आली आहे. खेमराज (४२, रा. हवाला खुर्द) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण माहिती होताच तुम्हालाही आर्श्चयाचा धक्का बसेल.

प्राप्त माहितीनुसार, खेमराज यांनी उदयपूरच्या (Udaipur) फतेहसागरच्या काठावरील राणी रोडवरील झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. खेमराजचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झाडाला लटकलेला पाहून बघ्यांची गर्दी झाली. यानंतर पोलिसांना आत्महत्येची माहिती देण्यात आली. पोलिसांना लगेच घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

खेमराज यांचे चार लग्न झाले होते. त्यांच्या एका पत्नीचे निधन झाले तर तीन पत्नी सोडून गेल्या. यामुळे खेमराज नाराज राहत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. सहा महिन्यांचा असताना आई निघून गेली. यानंतर वडिलांनी तीन लग्न केले. यातील एकीचा मृत्यू झाला तर दोन जण सोडून गेले, असे घटनास्थळी पोहोचलेला खेमराज यांचा मुलगा लक्ष्मण याने सांगितले.

खेमराज यांच्या खिशात आधार कार्ड सापडले. त्यावर खेमराज असे नाव लिहिले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येची माहिती दिली. खेमराज हे उदरनिर्वाहासाठी ऑटो चालवत असे, असे अंबामाता पोलिस ठाण्याचे एसएचओ सुनील टेलर, फतेहपुरा चौकीचे प्रभारी नथुसिंह जबते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT