Sukesh Chandrashekhar Arvind Kejriwal Sakal
देश

Sukesh Chandrashekhar: 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणाचं 'आप' कनेक्शन; सुकेश चंद्रशेखरनं केले गंभीर आरोप

सुकेश चंद्रशेखर यांनं दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मोठा दावा केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सध्या ज्या महाठगामुळं कोर्टवाऱ्या कराव्या लागत आहेत. त्या सुकेश चंद्रशेखर यानं २०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात आता आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपये आपला दिल्याच्या दाव्यामुळं नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. (Sukesh Chandrasekhar serious allegations on AAP regarding money laundering case)

दिल्लीस्थित पटियाला हाऊस कोर्टात आज मनीलॉंड्रिंग प्रकरणात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर हे उपस्थित होते. यावेळी सुकेश यानं आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केले. सुकेशचे वकील अॅड. अनंत मलिक यांनी सांगितलं की, सुकेश चंद्रशेखर यानं कोर्टाला सांगितलं की, त्यानं आम आदमी पार्टीला ६० कोटी रुपये दिले आहेत. त्याच्या या खळबळजनक दावा एका उच्चस्तरीय समितीनं नोंदवून घेतला आहे. तसेच हे आरोप गंभीर असून याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी शिफारसही यावेळी या समितीनं केली.

सुकेश चंद्रशेखरशी संबंधीत २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसच्या नावाचा देखील समावेश आहे. तिच्यावर आरोप आहेत की, तीन सुकेश चंद्रशेखर याच्याकडून कार आणि घरासहित अनेक महागडे गिफ्ट स्विकारले आहेत. ईडी आणि दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT