Rajnikanth_Yogi 
देश

Video: सुपरस्टार रजनीकांत CM योगींच्या पडले पाया; व्हिडिओ व्हायरल

लखनऊ येथील योगींच्या निवासस्थानी जाऊन रजनीकांत यांनी त्यांची भेट घेतली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या लखनऊमधील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. जेव्हा रजनीकांत यांचं आगमन झालं तेव्हा आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं.

यावेळी रजनीकांत यांनी खाली वाकून योगींच्या पाया पडले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Superstar Rajinikanth take blessing of Uttar Pradesh CM Yogi Adityanath with touch his feet video went viral)

व्हिडिओत नेमकं काय?

रजनीकांत आपल्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून खाली उतरले. त्यानंतर ते योगींच्या घराकडे जात असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या स्वागतासाठी दारात उभे आहेत. यावेळी हात जोडून योगी त्यांचं स्वागत करतात. (Marathi Tajya Batmya)

पण तेव्हाच रजनीकांत खाली वाकून योगींच्या पाया पडले आणि उभं राहून हात जोडून त्यांच्या स्वागताला प्रतिसाद दिला. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य देखील उपस्थित होते. (Latest Marathi News)

योगींसोबत 'जेलर' पाहणार - रजनीकांत

दरम्यान, या भेटीनंतर रजनीकांत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. "आपण मुख्यमंत्री योगींसोबत आपला ब्लॉकबस्टर 'जेलर' हा सिनेमा पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देवाचे आशीर्वाद आहेत की आमचा सिनेमा हीट होतोय असंही ते यावेळी म्हणाले"

सिनेमात रजनीकांत यांची उपस्थिती महत्वाची

तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मला देखील जेलर हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली. मी रजनीकांत यांचे अनेक सिनेमे पाहिले आहेत. ते खूपच टॅलेंटेड कलाकार आहेत. त्यांच्या सिनेमात खूप काही नसलं तरी केवळ आपल्या परफॉर्मन्सवर ते सिनेमा तरुन नेतात. त्यामुळं सिनेमात रजनीकांत यांची उपस्थिती ही खूपच महत्वाची गोष्ट असते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT