देश

लखीमपूर प्रकरणाचा अहवाल द्या; कोर्टाचे योगी सरकारला निर्देश

३ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आठ जणांचा मृत्यू झाला होता.

ओमकार वाबळे

लखीमपूर-खेरी हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ३ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे आठ जणांचा मृत्यू झाला होता. याच संदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये आरोपी कोण आहेत, कोणाविरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि अटक केलेल्यांची माहिती अहवालात नमूद करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही शेतकरी भाजपच्या नेत्यांचा विरोध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन लखीमपूर खेरी या ठिकाणी जमले होते. मात्र शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच यानंतर झालेल्या हिंसाचारात आणखी ४ सरकारी कर्मचारी मृत पावले. एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली.

या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापलं आहे. राहूल गांधी, प्रियंका गांधी यांनाही पीडितांच्या नातेवाईंकांना भेटण्यापासून रोखण्यात आलं. मात्र आता संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. हिंसाचारानंतर नोंदवलेल्या गुन्ह्याच्या अंतर्गत आता सुनावणीला सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT