Supreme Court sakal
देश

Supreme Court : ''सुप्रीम कोर्ट प्रत्येक समस्येसाठी रामबाण उपाय असू शकत नाही'' नर्सरी प्रवेशासंदर्भात टिपण्णी

संतोष कानडे

नवी दिल्लीः लहान मुलांच्या नर्सरी प्रवेशावेळी होणाऱ्या स्क्रीनिंगवर बंदी घालण्याच्या दिल्ली उच्च न्यालायाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

सुप्रीम कोर्ट प्रत्येक गोष्टीवर रामबाण उपाय असू शकत नाही, असं या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती एसके कौल आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी स्पष्ट केलं की, कोर्ट कायदा बनवण्याचे निर्देश देऊ शकत नाही. कायदा करण्याचा आदेश असू शकतो का? आम्ही सरकारला विधेयक मांडण्याचे निर्देश देऊ शकतो का? असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले.

३ जुलै रोजी हायकोर्टाने सोशल ज्युरिस्ट या संस्थेने दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते की, कायदेशीर प्रक्रियेमध्ये आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही. शिवाय दिल्ली शालेय शिक्षण (दुरुस्ती) विधेयक २०१५ संदर्भात उपराज्यपालांना निर्देश देऊ शकत नाही.

Adv. अशोक अग्रवाल यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या एनजीओच्या याचिकेत म्हटलं होतं की, नर्सरी प्रवेशांमध्ये होणाऱ्या स्क्रीनिंग प्रक्रियेवर बंदी घालणारे विधेयक प्रलंबित आहे. कोर्टाने या प्रक्रियेबाबत योग्य ते निर्देश द्यावेत.

त्यावर कोर्टाने उपराज्यपलांना निर्देश देणं योग्य नसल्याचं स्पष्ट करत प्रत्येक बाबतीत सुप्रीम कोर्ट हा रामबाण उपाय असू शकत नाही, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT