Supreme Court Commute Death Penalty To 20 Years Imprisonment  esakal
देश

'प्रत्येक पापी व्यक्तीला भविष्य असते', बलात्कार-हत्येप्रकरणी SC कडून फाशीची शिक्षा रद्द

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द केली आहे. न्यायमूर्ती यूयू ललित, एस. रवींद्र भट आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी दिलेली शिक्षा ही गुन्हेगाराची अपंग मानसिकता सुधारण्यासाठी नेहमीच निर्णायक घटक असू शकत नाही, असं निरीक्षण यावेळी न्यायालयानं नोंदवलं आहे.

मध्य प्रदेशातील आरोपी फिरोजने एप्रिल २०१३ मध्ये एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. त्याला ट्रायल न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच त्याचा सहआरोप राकेश चौधरी याला सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात धाव घेतली. यावेळी सहआरोप चौधरीची निर्दोष मुक्तता झाली. पण, न्यायालयाने फिरोजच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

आरोपी फिरोजने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती यूयू ललित, एस. रवींद्र भट आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी घेण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा २० वर्षांच्या कारावासात बदलली आहे. यावेळी आयरिश कवी आणि नाटककार ऑस्कर वाइल्ड यांच्या प्रसिद्ध ओळींचा हवाला देत “संत आणि पापी यांच्यातील फरक एवढाच आहे की प्रत्येक संताला भूतकाळ असतो आणि प्रत्येक पाप्याला भविष्य असते”, असे न्यायालयाने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT