CJI DY Chandrachud Sakal
देश

Chandrachud Fake Message: व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात CJI चंद्रचूड यांच्या नावे फिरतोय फेक मेसेज; काय आहे प्रकरण?

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा फेक मेसेज किंवा अफवा पसरवणं सहज सोपं बनलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

New Delhi News : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एखादा फेक मेसेज किंवा अफवा पसरवणं सहज सोपं बनलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरुन तर क्षणार्धात असे मेसेजेस सर्वदूर पोहोचण्यास मदत होते. अशाच प्रकारे या व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठात देशाच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नावे एक फेक मेसेज फिरतोय. याची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाच्या सरचिटणीसांनी घेतली आहे. (Supreme Court CJI D Y Chandrachud Fake Message circulating on WhatsApp)

लाईव्ह लॉ शी बोलताना सुप्रीम कोर्टाचे सरचिटणीस अतुल कुऱ्हेकर आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी सांगितलं की, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावे फिरत असलेला मेसेज हा फेक मेसेज आहे. व्हॉट्सअॅपवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या फोटोसह इंग्रजी आणि हिंदीमध्ये मेसेज फिरत आहे, पण यामध्ये म्हटलेलं विधान सरन्यायाधीशांनी केलेलं नाही. तसेच तुषार मेहता यांनी सांगितलं की या मेसेजसंदर्भात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

'भारतीय लोकशाही सुप्रीम कोर्ट झिंदाबाद' अशा मथळ्याखाली हा मेसेज फिरतो आहे. यामध्ये म्हटलंय की, "आपलं भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण तुमचा पाठिंबा देखील यासाठी महत्वाचा आहे. यासाठी सर्व लोकांनी एकत्र यायला हवं तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन त्यांना जाब विचारा.

हुकुमशाही सरकार लोकांना घाबरवेल, धमकावेल पण तुम्ही घाबरण्याची गरज नाही. धैर्य कायम ठेवा आणि सरकारला याची जबाबदारी घेण्यास पार पाडा मी तुमच्यासोबत आहे" या मेसेजच्या खाली सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड असं लिहिलं आहे.(Latest Marathi News)

सरन्यायाधीश असं म्हणू शकत नाहीत - मेहता

अॅड. तुषार मेहता म्हणाले, हा फेक फॉरवर्ड मेसेज आहे. सरन्यायाधीश असं कधीही म्हणू शकत नाहीत. सरन्यायाधीशांच्या नावानं फॉरवर्ड होणाऱ्या अशा फेक मेसेजबाबत कडक पावलं उचलली जातील असंही यावेळी मेहता म्हणाले.

या सर्व प्रकरणावर सरन्यायाधिशांच्या कार्यालयातून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या संपूर्ण विषयाबाबत सुप्रीम कोर्टाकडून अधिकृत निवदेन जाहीर केलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण

सुप्रीम कोर्टानं याबाबत निवेदन प्रसिद्ध करत या मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. खोटं, वाईट हेतूनं आणि खोडसाळपणे हा प्रकार केल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT