health sector news neet pg 2022 supreme court 1456 seats vacant in medical petition was quashed by Supreme Court today  sakal
देश

NEET UG 2024 Exam: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! NEETची होणार नाही फेर परीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

NEET UG 2024 Exam: NEET परीक्षेतील संभाव्य घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर याची फेर परीक्षा घेण्यबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतंय? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Amit Ujagare (अमित उजागरे)

NEET UG 2024 Exam: NEET परीक्षेतील संभाव्य घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर याची फेरपरीक्षा घेण्यबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतंय? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावर अखेर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला असून नीटची फेरपरीक्षा होणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

देशभरात वैद्यकीय सेवेसाठी अर्थात डॉक्टर होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात 'नीट' परीक्षा ५ मे २०२४ रोजी पार पडली होती. यावेळी देशभरातील विविध राज्यांमधील विविध परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पेपरफुटीचे प्रकार घडले होते. तसंच यापरीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. अशा विविध गैप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली.

यावेळी सुनावणी दरम्यान, कोर्टानं काही महत्वाच्या टिप्पण्या केल्या होत्या. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, "सीबीआयच्या चौकशीचा अहवाल सांगतो की अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच सीबीआयनं असं निरिक्षण नोंदवलंय की, हजारीबाग आणि पटना केंद्रावरीव १५५ विद्यार्थ्यांना पेपरफुटीचा फायदा मिळाला होता. पण याची सीबीआयची चौकशी अद्याप अंतिम टप्प्यात आलेली नाही"

सुप्रीम कोर्टानं यावेळी असंही म्हटलं की, "सध्याच्या टप्प्यावर परीक्षेचा निकाल चुकीचा आहे किंवा निकालात पद्धतशीरपणे फेरफार झाल्याचा निष्कर्ष रेकॉर्डवर आलेला नाही. रेकॉर्डवरील डेटा NEET-UG प्रश्नपत्रिका पद्धतशीरपणे लीक झाल्याचंही म्हटलेलं नाही. पण जर या परीक्षेच्या फेर परीक्षेचे आदेश दिल्यास या परीक्षेत बसलेल्या २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतील. त्यामुळं संपूर्ण NEET-UG परीक्षा रद्द करण्याचा आदेश देणं समर्थनीय नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT