देश

SC on Abortion:२६ आठवड्यानंतरच्या गर्भपाताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली,'त्या बाळाची काळजी सरकार घेणार'

या गर्भधारणेमुळे महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही आणि हे प्रकरण अभ्रकाच्या विकृतीशी निगडीत नाहीये. या महिलेवर AIIMSमध्ये उपचार करण्यात येतील, असेही कोर्टाने सांगितले.

Manoj Bhalerao

Supreme Court on Abortion Case:सुप्रीम कोर्टात एका महिलेने २६ आठवड्यानंतर गर्भपातासाठी न्यायालयात परवानगीसाठी याचिका दाखल केली होती. ही गर्भपातासाठी केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की जन्मानंतर या बाळाची काळजी सरकारकडून घेण्यात येईल. हा निर्णय तेव्हा घेण्यात आला जेव्हा, या महिलेने तिच्या गर्भपातासाठी AIIMSला निर्देश द्यावेत अशी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती. हा निर्णय तेव्हा कोर्टाने राखून ठेवला होता.

कोर्टाने या गर्भपातासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता, कारण गर्भधारणा होऊन २४ आठवड्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला होता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं की या गर्भधारणेमुळे महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही आणि हे प्रकरण अभ्रकाच्या विकृतीशी निगडीत नाहीये. या महिलेवर AIIMSमध्ये उपचार करण्यात येतील, असेही कोर्टाने सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला महिलेने कोर्टात धाव घेतली होती, काही आजारपणामुळे तिला गर्भधारणा झाली हे समजलं नाही, असे तिने कोर्टाला सांगितले. तिला 'लॅक्टेशनल एमेनोर्हिया'हा आजार झाला होता,ज्यामध्ये मासिक पाळी थांबली होती. त्यावेळी मानसिक तणावातही होती.

मेडिकल टर्मीनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MPT) कायद्याअंतर्गत, गर्भपात करण्यासाठी जास्तीत जास्त २४ आठवड्यांची मर्यादा आहे, यामध्ये विवाहित महिला, बलात्कारातील पीडितांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT