SC dismissed plea against nestle google
देश

'Magic Masala' शब्द कोणीही वापरू शकतं, SC चा नेस्लेला दिलासा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नेस्ले (Nestle) कंपनीला त्याच्या इन्स्टंट नूडल्सच्या संदर्भात 'मॅजिक मसाला' हे टॅगलाईन वापरण्यापासून रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. याबाबत ITC लिमिटेडने मद्राम उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, एकल न्यायालयाधीशांनी दिलेल्या आदेशात हस्क्षेप करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

ITC लिमिटेडने २०१० मध्ये 'मॅजिक मसाला' फ्लेवर आणला होता. त्यानंतर नेस्लने २०१३ मध्ये 'Maggi Xtra Delicious Magical Masala' हा शब्दप्रयोग वापरण्यास सुरुवात केली. मॅजिक मसाला हा आमच्या ट्रेडमार्कशी संबंधित असल्याचा दावा ITC ने केला होता. नेस्लेने त्याच टॅगचा वापर केल्यामुळे लोकांच्या मनात आमच्या उत्पादनाबाबत गोंधळ निर्माण होईल, असा आयटीसीचा दावा होता. ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतून नेस्लेने सारखी टॅगलाईन वापरल्याचा आरोप आयटीने केला होता. तसेच ही टॅगलाईन वापरण्यापासून नेस्लेला रोखण्यात यावे यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांसमोर याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने दोन वेगळे ब्रँड ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतात हा युक्तिवाद फेटाळून लावत त्यांची याचिका फेटाळून लावली होती. ''मॅजिक मसाला हे कोणालाही वापरता येईल. त्यावर कोणाचा विशेषाधिकार नाही'', असं एकल न्यायाधीशाच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांनी देखील एकल न्यायाधीशांनी दिलेला आदेश कायम ठेवला. आव्हान दिलेले शब्द हे ITC चे ट्रेडमार्क नाहीत. तुमचा ट्रेडमार्क पूर्णपणे वेगळा होता. कोणीही मॅजिक मसाला किंवा मॅजिक किंवा मसाला वापरू शकतो, असे खंठपीठाने म्हटले होते. त्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: नाशिकमधील अत्याचार प्रकरणानंतर नामांकित आयटी कंपनीचे युनिट बंद होणार

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

IPL 2026: पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११

फिनालेपूर्वी 'हा' सदस्य घराबाहेर! बिग बॉसच्या पर्वातलं धक्कादायक Eviction, कोण आहे ती व्यक्ती?

SCROLL FOR NEXT