supreme court  
देश

‘कुरआन’बाबतची याचिका कोर्टाने फेटाळली; सय्यद रिझवींना ठोठावला दंड

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  उत्तरप्रदेश केंद्रीय वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी सादर केलेली पवित्र कुरआनमधील काही आयत हे वगळले जावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. काही कट्टरपंथीय घटक हे याच आयताचा गैरफायदा घेत दहशतवादाचा प्रसार करतात, असा आरोप या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावतानाच रिझवी यांना ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. न्या. आर. एफ.नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने अशा प्रकारची याचिका सादर करणे हेच मुळात मूर्खपणा असल्याचे सांगितले. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, ‘‘ या पवित्र ग्रंथाचा समावेश हा अनेक मदरशांमधील अभ्यासक्रमामध्ये देखील करण्यात आला असून लहान वयांमध्ये मुलांवर कट्टरपंथीय विचारांचे संस्कार केले जात आहेत. धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराखाली त्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही. कारण यामुळे लहान मुलांमध्ये कट्टरपंथीय विचारांचे बीजारोपण होते.’’ याचिकाकर्त्यांचे हे म्हणणे न्यायालयाने फेटाळून लावले. भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लक्ष्मण बांदल; शशिकांत शिंदेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Latest Marathi News Update : पुण्यात बी. जे. मेडिकल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु

Bangladesh Onion Export : कांद्याच्या बाजारात नवा खेळाडू, श्रीलंकेसाठी बांगलादेशाची निर्यात तयारी; भारतीय कांद्यासमोर नवे आव्हान

SCROLL FOR NEXT