supreme court electoral bond scheme attorney general affidavit marathi news  
देश

Supreme Court : 'मतदारांना पक्षांच्या निधीची स्रोत जाणून घेण्याचा अधिकार नाही'; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडली..

रोहित कणसे

राजकीय पक्षांना निधी देण्याच्या अपारदर्शक इलेक्टोरल बाँड पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्राने रविवारी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. यावेळी ऍटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांनी सर्वोच्च न्यायालयात संविधानाने जनतेला इलेक्टोरल बाँडचा स्त्रोत जाणून घेण्याचा मूलभूत अधिकार दिलेला नाही अशी माहिती दिली आहे.

वेंकटरामणी म्हणाले की, ही योजना कोणत्याही व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही आणि घटनेच्या भाग III अंतर्गत कोणत्याही अधिकाराच्या विरुद्ध आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे ही योजना बेकायदेशीर ठरणार नाही. तसेच हा कायदा इतर कोणत्याही कारणाने रद्द करता येत नाही.

एजी आर वेंकटरामानी म्हणाले की, 2003 मध्ये पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर मतदारांना उमेदवारांची योग्य निवड करण्यासाठी उमेदवारांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी असे निर्देश दिले होते. उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घेण्याचा अधिकार उमेदवाराच्या निवडीसाठी उपयुक्त आणि संबंधित असू शकतो, परंतु त्याची सध्याच्या प्रकरणाशी तुलना करता येणार नाही.

2017 मध्ये इलेक्टोरल बाँड योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान केंद्र सरकारने यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, इलेक्टोरल बाँड योजना पारदर्शक आहे. इलेक्टोरल बाँड हे प्रॉमिसरी नोटसारखे असते, जे कोणतीही भारतीय व्यक्ती किंवा कंपनी SBI च्या निवडक शाखेतून म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामधून खरेदी करू शकते.

तसेच या बाँडद्वारे, कोणताही भारतीय नागरिक किंवा कंपनी त्याच्या पसंतीच्या राजकीय पक्षाला देणगी देऊ शकते. ही योजना (इलेक्टोरल बाँड्स) केंद्र सरकारने राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढेल या उद्देशाने सुरू केली होती. दरम्यान राजकीय पक्षांना देणग्यांसाठी इलेक्टोरल बाँड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर 31 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Hardik Panyda Trade: २५ कोटीसह कर्णधारपदही मिळणार! हार्दिक पांड्यासाठी नवी फ्रँचायझी मैदानात; Mumbai Indians ला दिलीय अशी ऑफर, जी नाकारता येणार नाही...

SCROLL FOR NEXT