supreme court supreme court
देश

पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : SC

Pegasus Spyware : सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच या बद्दलचे सविस्तर आदेश देण्यात येणार आहे.

सुधीर काकडे

देशात खळबळ निर्माण करणाऱ्या पेगासस स्पायवेअर प्रकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवडाभरात या बद्दलचे पुढील आदेश देण्यात येतील असे न्यायालयाने सांगितले आहे. यापुर्वी झालेल्या सुनावणीमध्ये सरकारकडून या प्रकरणातील कुठलीही माहिती आम्ही उघड करु शकत नाही, कारण असे केल्यास राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण होऊ शकते असे सांगण्यात आले होते.

सरन्यायाधीश रमणा यांनी ज्येष्ठ वकील सी.यू. सिंग यांना सांगितले की, न्यायालय पेगासस प्रकरणामध्ये या आठवड्यात एक चौकशी समिती स्थापन करण्याचा आदेश देईल. केंद्राने यापूर्वी भारतातील काही पत्रकार आणि राजकारण्यांच्या फोनची हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअरचा वापर केला आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांच्या स्वतंत्र समितीची स्थापना केली जावी.

यापुर्वी सुप्रीम कोर्टात पेगासस प्रकरणावर झालेल्या सुनावणीमध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडताना , 'सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार या प्रकरणात कुठलीही जोखीम घेऊ शकत नाही, नागरिकांच्या खासगी आयुष्याचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहेच, मात्र त्यासोबतच सरकारवर राष्ट्रीय सुरक्षेची देखील जबाबदारी आहे' असे सांगितले होते. एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT