देश

सीबीआयच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वृत्तसंस्था

कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली. तर कारवाईस अटकाव झाल्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या  सुनावणी होणार आहे. 

शारदा चिडफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त रजीव कुमार हे सीबीआयला सहकार्य करीत नाहीत. त्यांना सहकार्याबाबत निर्देश देण्यात यावेत या मागणीसाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टा याचिका दाखल केली आहे. अनेकदा समन्स बजावूनही राजीव कुमार यांनी सीबीआयला सहकार्य केले नाही, तसेच चिडफंड घोटाळ्यातील पुरावे ते नष्ट करु शकतात असा आरोप सीबीआयने याचिकेत केला आहे. त्यामुळे यावर आजच सुनावणी घेण्यात यावी असे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले.

मात्र, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आजच यावर तातडीने सुनावणी घेणे गरजेचे नसल्याचेही स्पष्ट केले. सीबीआयला आधी कोर्टात पुरावे सादर करावेत त्यानंतर याप्रकरणी सुनावणी घेण्यात येईल असे कोर्टाने म्हटले आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT