Elephant Task Force esakal
देश

विजेच्या धक्क्यानं 333 हत्तींचा मृत्यू; Supreme Court ची नोटीस

सकाळ डिजिटल टीम

हत्तींच्या मृत्यूच्या संख्येत चिंताजनक वाढ झाल्यामुळं भारताला भीषण वास्तवाला सामोरं जावं लागतंय.

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) बुधवारी एका जनहित याचिकेवर नोटीस जारी केलीय. यात देशातील विजेच्या धक्क्यानं होणाऱ्या मृत्यूंच्या समस्येबाबत न्यायालयाच्या त्वरित हस्तक्षेपाची मागणी करण्यात आलीय. प्रेरणा सिंह बिंद्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमना (Chief Justice N. V. Ramana) यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांचे वकील अभिकल्प प्रताप सिंह (Advocate Abhikalp Pratap Singh) यांनी असा युक्तिवाद केलाय, की हत्तींच्या अनैसर्गिक मृत्यूच्या संख्येत चिंताजनक वाढ झाल्यामुळं भारताला भीषण वास्तवाला सामोरं जावं लागतंय, ते त्यांना समोर आणायचंय.

या अनैसर्गिक मृत्यूचं मुख्य कारण म्हणजे, विजेच्या तारांमधून येणारा विद्युत प्रवाह. या समस्येचं गांभीर्य पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयानं स्थापन केलेल्या तज्ञ संस्थांनी प्रमाणित केलंय, असं त्यात म्हटलंय. या क्रमवारीत एलिफंट टास्क फोर्सचा (Elephant Task Force) 2010 चा 'गज' अहवाल चिंताजनक आकडेवारी सांगत आहे.

भारतातील हत्तींच्या (Elephant) मृत्यूचं सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणून हेतुपुरस्सर आणि अपघाती विद्युत शॉकच्या (Electric shock) घटनांमध्ये हत्तींच्या मृत्यूची संख्या ओळखलीय. त्याच वेळी, संसदेसमोर सादर केलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलंय, की 2014-15 आणि 2018-19 दरम्यान मानवांशी झालेल्या संघर्षात 510 पैकी 333 हत्तींचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं झालाय. म्हणजेच, हत्तींच्या सर्व अनैसर्गिक मृत्यूंपैकी जवळजवळ दोन तृतीयांश मृत्यू विजेच्या धक्क्यानं होतात, असं अहवालात स्पष्ट झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT