SC Judge M R Shah sakal
देश

SC Judge M R Shah : माझ्या आयुष्याचा नवा टप्पा सुरू! निरोप समारंभाप्रसंगी न्या. शहा यांची भावना

पाणावलेल्या डोळ्यांनी राज कपूर यांच्‍या गाण्यातील ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा,’ या ओळी म्हणताना बांध फुटला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘मी निवृत्त होणारी व्यक्ती नाही. मी आयुष्याचा नवा टप्पा सुरू करणार आहे. या नव्या आयुष्यासाठी शक्ती, धाडस आणि चांगले आयुष्य द्यावे, अशी प्रार्थना मी ईश्‍वराकडे करतो,’’ अशी भावना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. शहा यांनी सोमवारी व्यक्त केली. पाणावलेल्या डोळ्यांनी राज कपूर यांच्‍या गाण्यातील ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा,’ या ओळी म्हणताना बांध फुटला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या खटल्याची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर पार पडली. त्यातील पाच सदस्यांमध्ये न्या. एम. आर. शहा यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाचे चौथे ज्येष्ठ न्यायाधीश शहा यांचा आज कामाचा शेवटचा दिवस होता. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाच्यावतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बार कौन्सिलचे ए.जी. व्यंकटरामाणी, एस.जी. मेहता, वरिष्ठ विधिज्ञ प्रतापकुमार राय आदी सदस्य उपस्थित होते.

आव्हान स्वीकाण्यास कायमच तयार

न्या. शहा यांच्या सन्मानार्थ केलेल्या भाषणात सरन्याधीशांनी त्यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभव सांगितले. ते म्हणाले, की मी भारताचा अतिरिक्त सॉलिसीटर जनरल असल्यापासून शहा यांच्याशी माझे नाते आहे. ते नंतर सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर आमच्या मैत्रीला एक नवी ओळख मिळाली. कोरोनाच्या साथीच्या कठीण काळात आम्ही एकत्र बसत असू.

गुन्हेगारी किंवा ‘जीएसटी’सारख्या नव्या कायद्यासंबंधीची सुनावणी असो, न्या. शहा आव्हान स्वीकाण्यास कायमच तयार असत. जर एखादा निर्णय मी त्यांच्याकडे पाठविला तर पुढील ४८ तासांत तो टिप्पणीसह लिखित रूपात माझ्या टेबलावर आलेला असे. न्यायदानातील त्यांच्या सखोल ज्ञानावर मी अनेक प्रकारे अवलंबून असे. ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचीही यावेळी भाषणे झाली.

मला माफ करा!

निरोपाचे भाषण करताना न्या. शहा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा करताना मदत केल्याबद्दल बारमधील आणि रजिस्ट्रीच्या सदस्यांचे आभार मानले. तसेच सहाय्यक कर्मचारी आणि निवासस्थानातील कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. ‘‘माझ्या कारकिर्दीत कोणाच्या भावना दुखावल्या असतील मला माफ करा.

मी नेहमी आपल्या कामाला पूजेसमान मानले आहे. तुमच्याकडून मिळालेले प्रेम आणि स्नेहाबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन,’ असे ते म्हणाले. भाषणाच्या शेवट करताना त्यांचा कंठ दाटून आला होता. राज कपूर यांच्या गाण्यातील ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा,’ हे पंक्ती म्हणताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT