

Bachchu Kadu Hints at Possible Move Amid Political Buzz
Esakal
माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर बच्चू कडू यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाल्याच्या चर्चाही बच्चू कडू यांनी फेटाळून लावली आहे. तर दुसरीकडे आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. काय चर्चा होते त्यावर ठरवू असं म्हणत बच्चू कडू यांनी प्रश्नाला बगल दिली.