Supreme Court  sakal
देश

Supreme Court : खटल्यांची माहिती मिळणार व्हॉट्सॲपवर ; सर्वोच्च न्यायालयाचे डिजिटल पाऊल

सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठविण्यात येईल अशी घोषणा केली आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल.

सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी (आयसीटी) सर्व्हिसेस’सोबत व्हॉट्‍सॲपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली. सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप क्रमांकदेखील शेअर केला.

आदेश, निकालही कळणार

सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल? तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला? महत्त्वाचे आदेश आणि निकाल यांचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. बार कौन्सिलच्या सर्व सदस्यांनादेखील रजिस्ट्रीच्या माध्यमातून हे संदेश पाठविण्यात येतील. एखाद्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याचा तपशील व्हॉट्‍सॲपवरून पाठविण्यात येईल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे म्हटले आहे.

यामुळे काय होणार?

  • न्यायालयाचा वेळ अन् कागद वाचणार

  • अधिकाधिक लोकांपर्यंत कोर्ट पोचेल

  • दुर्गम भागातील लोकांनाही सहज ॲक्सेस

  • जिव्हाळ्याचे विषय नागरिकांना समजतील

‘क्लाउड’वर सर्व काही मिळणार

न्यायालयाच्या सगळ्या सेवा आता ‘मेघराज क्लाउड २.०’ येणार आहेत. ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ने (एनआयसी) हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. आता न्यायालयाचा डेटा या क्लाउडवर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

Ratnagiri MIDC Water Storage 2026 : उद्योगांची पाण्याची चिंता आता मिटणार! 'या' पाच धरणांत मे-जूनपर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा; MIDC कडून पाण्याचे चोख नियोजन

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

SCROLL FOR NEXT