DY chandrachud Sakal
देश

भारताचे सुप्रीम कोर्ट हे 'लोकांचे न्यायालय...CJI चंद्रचूड यांनी अमेरिकेच्या SC शी केली तुलना

Sandip Kapde

अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय एका वर्षात सुमारे 80 प्रकरणे निकाली काढते, तर या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 72 हजार प्रकरणे निकाली काढली आहेत आणि लोकांची सेवा करण्याची आपली वचनबद्धता दर्शविली आहे, असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाशी तुलना करताना त्यांनी ही माहिती दिली. एचटी लीडरशीप समिट 2023 शेवटच्या सत्रात CJI चंद्रचूड बोलत होते.

डी वाय चंद्रचूड यांनी यूएस आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तुलना करताना न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल त्यांचा दृष्टिकोन सांगितला. अमेरिकन न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय नाही. तर भारतात न्यायाधीश निवृत्त होतात. न्यायाधीश देखील मानूस आहे त्यामुळे ते देखील चुकू शकतात. त्यामुळे येणार्‍या पिढ्यांवर जबाबदारी सोपवणे महत्त्वाचे आहे. (Latest Marathi News)

यावेळी न्यायालयांमध्ये मागासवर्गीय आणि महिलांची संख्या कशी वाढेल? यावर देखील CJI चंद्रचूड यांनी भाष्य केले. संपूर्ण भारतात जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक महिलांची नियुक्ती केली जात आहे. ही चांगली गोष्ट आहे.

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 120 पैकी 70 महिलांची नियुक्ती केली जाते.लॉ फर्ममध्ये महिलांची नियुक्ती झाली की, कुटुंबाची जबाबदारीही महिलांवर असते आणि मुलांचे संगोपन करावे लागते, अशी मानसिकता असते. हा विचार बदलल्याशिवाय सुधारणा शक्य नाही, असे देखील चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT