Supreme Court Lifts Ban On Malyalam News Channel sakal
देश

Supreme Court : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वकिलांच्या एका गटाने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर हा निर्णय़ झाला आहे.

वैष्णवी कारंजकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि त्याची रजिस्ट्री बंद राहणार आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार मंगळवारी याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले.

त्याआधी, सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या एका गटाने सर्वोच्च न्यायालयासाठी आंबेडकर जयंतीचा अधिकृत सुट्टी म्हणून समावेश करण्याची मागणी करणारे पत्र सरन्यायाधीशांना लिहिलं होतं.

वार्षिक कॅलेंडरचा भाग म्हणून सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये १४ एप्रिलचा समावेश केला नव्हता. ही गोष्ट काही वकिलांनी अधोरेखित केली.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, गेल्या वर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकरांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली होती आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून वर्णन केले होते. "वैयक्तिकरित्या, माझ्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांबद्दल मला खूप आदर आहे. आज आपण जे काही आहोत ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे आहे," असंही चंद्रचूड म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT