Supreme Court Esakal
देश

Supreme Court : 'डोक्यावर छत असणे हा सर्वांचा अधिकार...'; 'बुलडोजर कारवाई'वरुन सर्वोच्च न्यायालयाने टोचले सरकारचे कान

Supreme Court : लखनौच्या अकबर नगरमधील 24 कथित बेकायदेशीर वसाहती पाडण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लखनौच्या अकबर नगरमधील 24 कथित बेकायदेशीर वसाहती पाडण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली.

कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यावर छत असणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. परंतु सरकारी धोरणे लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे देऊ शकत नसतील, तर अनधिकृत वसाहती निर्माण होणे निश्चित आहे.

अकबर नगर, लखनौ येथील 24 कथित बेकायदेशीर वस्त्या पाडण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानेच ही टिप्पणी केली.

या २४ बेकायदा वसाहती पाडण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. ज्या लोकांची घरे पाडण्यात आली आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे का, अशी विचारणा न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, येथील सरकारच्या काही त्रुटी आहेत. डोक्यावर छत असणे म्हणजेच घर असणे हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे.

न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, ही जमीन सरकारची असून सरकारी जमिनीवरील बांधकाम बेकायदेशीर असल्याचे लोकांनी मान्य केले आहे. खंडपीठाने याचिकाकर्त्यांना त्यांचे सामान काढण्यासाठी 4 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंतची मुदत दिली आहे.

यानंतर एलडीए जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यास मोकळे होईल, असे खंडपीठाने सांगितले. २७ फेब्रुवारी रोजी अलाहाबाद हायकोर्टाने जागा ताब्यात घेणाऱ्यांची याचिका फेटाळून लावण्याचा मार्ग मोकळा केला होता.

लखनौ विकास प्राधिकरणाच्या (एलडीए) योजनेंतर्गत पर्यायी घरांसाठी अर्ज करण्याचा याचिकाकर्त्यांना अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही बेकायदा बांधकामे पाडण्याचे अधिकार एलडीएला आहेत. यासोबतच ही बेकायदा बांधकामे पाडण्यापूर्वीचे आणि नंतरचे फोटो काढण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT