CJI Chandrachud Esakal
देश

Manipur Violence :"... नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल" मणिपूर व्हिडिओवर CJI चंद्रचूड यांनी सरकारला फटकारले

मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची काढली विवस्त्र धिंड! माणुसकीला लाज आणणारी घटना आली समोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवरून रस्त्यावरून संसदेपर्यंत गदारोळ सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेतली आहे. यावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी जोरदार टीका करत केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे. जे व्हिडिओ समोर आले आहेत ते चिंताजनक असल्याचे सीजेआय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. याप्रकरणी मे महिन्यापासूनच कारवाई व्हायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल असंही चंद्रचूड यांनी म्हंटलं आहे.

मणिपूरमध्ये माणुसकीला काळीमा फसणारी आणणारी घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. मणिपूरमध्ये महिलांसोबत जे काही झाले ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. यावर सरकारने तातडीने कारवाई करावी. त्यावर सरकारने कारवाई न केल्यास आम्ही करू, असे न्यायालयाने म्हटले आहे.

जातीय संघर्षामध्ये महिलांचा वस्तू म्हणून वापर करणे हे संविधानाचे उल्लंघन आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो अतिशय अस्वस्थ करणारा आहे. या घटनेवर सरकारने कारवाई न केल्यास आम्ही करू असंही न्यायालयाने म्हंटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारला या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याबाबत न्यायालयाला माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जे काही दाखवले गेले आहे आणि या हिंसाचारात महिलांचा वापर केला जात आहे तो घटनात्मक लोकशाहीच्याविरुद्ध आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याबाबतच्या सर्व घटनांची माहिती द्यावी. सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT