Supreme Court esakal
देश

Fact Check Unit: केंद्र सरकारला धक्का! 'फॅक्ट चेक' युनिटच्या सूचनेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

केंद्र सरकारने एक दिवसापूर्वी प्रेस इन्मफॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) अंतर्गत फॅक्ट चेकसाठी एका युनिटची घोषणा केली होती.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केंद्र सरकारने एक दिवसापूर्वी प्रेस इन्मफॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) अंतर्गत फॅक्ट चेकसाठी एका युनिटची घोषणा केली होती. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणामध्ये केंद्राच्या या सूचनेला स्थगिती दिली आहे. (Supreme Court Puts On Hold Centre Notification On Its Fact Check Unit Press Information Bureau pib)

विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारच्या निर्णयाच्या मार्ग मोकळा केला होता. पण, सुप्रीम कोर्टाने सूचनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेतली. सरन्यायाधीश म्हणाले की, यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा अंतर्भूत. मात्र, कोर्टाने याप्रकरणी इतर काही भाष्य करणे टाळलं आहे.

सरकारविरोधात याचिका

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि इडिटर गिल्ड ऑफ इंडियाने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. केंद्र सरकारला फॅक्ट चेक संदर्भातील सूचनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण, मुंबई हायकोर्टाने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती. सरकारने स्थापन केलेले नवे युनिट हे मागील वर्षी केंद्र सरकारने दुरुस्ती केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील एका तरतुदीचा भाग आहे.

याचिकाकर्त्यांनी सुधारित नियमांना विरोध दर्शवला होता. सुधारित नियमांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यापासून सरकारला रोखण्यात यावे. कोर्टाने तसे आदेश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने यामुळे कोणतीही गंभीर हानी होणार नाही, असं म्हटलं होतं.

नेमकं काय होणार आहे?

सोशल मीडियावर सरकारविरोधात व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्या, पोस्ट, व्हिडिओ यावर हे युनिट नियंत्रण ठेवणार आहे. अशा प्रकरणामध्ये युनिट संबंधित पोस्ट ओळखून तशी सूचना सोशल मीडिया कंपनीला देईल. त्यानंतर कंपनीला ती पोस्ट काढावी लागेल किंवा त्यावर डिस्क्लेमर द्यावं लागेल. तसं करण्यास कमी पडलेल्या सोशल मीडिया कंपन्यांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोगळा असणार आहे. त्यामुळे अनेक संस्थांनी याला विरोध केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT