Supreme Court on Gyanvapi Mosque case esakal
देश

ज्ञानवापी मशीद प्रकरण SC त, आदेश देण्यास सरन्यायाधीशांचा नकार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचे (Gyanvapi Mosque Case) प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचले आहे. वाराणसी अंजुमन-ए-इंतेजामिया मशीद व्यवस्थापन समितीने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपल्या याचिकेतून आव्हान दिले होते. पण, सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही आदेश देण्यास नकार दिला आहे.

कनिष्ठ न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती केली होती. त्यानंतर समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 21 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने वाराणसी येथील कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने मशीद समितीचा अर्ज फेटाळला होता. आता समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाच्या बाबतीत सध्या आहे ती स्थिती कायम ठेवण्याची मागणी केली होती. पण, सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा म्हणाले की, कागदपत्रे पाहिल्याशिवाय आदेश जारी करता येणार नाहीत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लवकरच सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.

एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी दुपारी वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण 17 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. सर्वेक्षण सुरूच राहील आणि गरज पडल्यास सर्वेक्षण करणारे मशिदीच्या आत जाऊन व्हिडिओग्राफी करू शकतील, असेही न्यायालयाने म्हटले होते. पण, ट्रायल कोर्टाचा सर्व्हेचा आदेश प्रार्थनास्थळ कायदा 1991 च्या विरोधात आहे, असं याचिकाकर्त्याचे वकील हुफेजा अहमदी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT