NEET PG Exams Updates Sakal
देश

NEET अवघ्या काही दिवसांवर; जाणून घ्या अभ्यासाच्या काही टिप्स!

NEET परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयात आज NEET-PG 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. २१ मे रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही याचिकाच फेटाळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला सुरुवात करण्याची गरज आहे.

NEET परीक्षेला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने अभ्यासाला सुरुवात करायला हवी. त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स - (How to prepare for NEET-PG Exam in 15 days)

  • विद्यार्थ्यांनी आता जास्तीत जास्त लक्ष रिव्हिजनवर केंद्रित करायला हवं. तसंच ज्या विषयांमधला आपला थोडा कमी अभ्यास झालाय, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवं.

  • आता शेवटचे काही दिवस राहिलेले असल्याने व्यवस्थित वेळापत्रक तयार करून अभ्यास केला पाहिजे. नुसतंच वेळापत्रक तयार करून उपयोग नाही, तर ते पाळायलाही हवं.

  • परीक्षेच्या दिवसापर्यंत शक्य तेवढ्या मॉक टेस्ट (NEET-PG 2022 Mock Test) सोडवा. यामुळे तुम्हाला परीक्षेचं स्वरुप सविस्तरपणे कळेल आणि वेळेत पेपर सोडवण्याची तयारीही होईल. तुमच्या चुकाही तुमच्या लक्षात येतील.

  • तुम्ही काढलेल्या नोट्स पुन्हा एकदा वाचून काढा. नोट्स काढल्या नसतील तर नव्याने नोट्स काढण्यात वेळ घालवू नका. मॉक टेस्टवर अधिक भर द्या.

  • तुम्हाला ज्या काही शंका असतील, त्या तुमच्या शिक्षकांकडून किंवा मार्गदर्शकांक़डून सोडवून घ्या.

  • शारिरीक आणि मानसिक आरोग्य जपा. परीक्षा जवळ आल्याने अनेक जणांना टेन्शन येतं. यामुळे न खाणं, अति खाणं, नीट झोप न घेणं असं अनेक विद्यार्थी करतात, पण हे परीक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. अशामुळे ऐन परीक्षेत तुम्ही आजारी पडू शकता.

  • त्यामुळे परीक्षेआधीच्या दिवसांमध्ये नियमित झोप घेणं, योग्य आणि चौरस आहार घेणं, मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आनंद मिळेल अशा गोष्टी काही काळ करणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT