Arvind Kejriwal 
देश

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टानं याचा निकाल राखून ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातच या घडामोडी घडत असल्यानं सुप्रीम कोर्टाचा हा निकाल काय असेल? याकडं सर्वांच्या नजरा लागू राहिल्या आहेत. (Supreme Court Reserves Order On Arvind Kejriwal Challenging ED Arrest Remand In The Delhi Excise Policy Case)

अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात ईडीच्या अटकेच्या कारवाईविरोधात याचिका दाखल केली होती. ईडीनं आपल्यावर केलेली अटकेची कारवाई ही बेकायदा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर सुप्रीम कोर्टानं ईडीला नोटीस पाठवत केजरीवालांच्या खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी घ्या अन्यथा आम्ही त्यांच्या जामिनाबाबत विचार करु शकतो असं म्हटलं होतं.

त्यानुसार, दरम्यान, ईडीनं केजरीवालांच्या जामिनाला विरोध करताना केजरीवाल हे स्वतः लोकसभेला उमेदवार नाहीत त्यांमुळं पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करण हा त्यांचा मुलभूत अधिकार असू शकत नाही. त्यामुळं त्यांना जामीन मंजूर करु नये, असं म्हटलं होतं.

पण सुप्रीम कोर्टानं ईडीचा हा युक्तीवाद अमान्य करत त्यांना २ जूनपर्यंत हंगामी जामीन मंजूर केला. तिहारमधून सुटका झाल्यानंतर ते थेट लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाले. प्रचारात त्यांनी मोदींसह भाजपवर दररोज शाब्दिक हल्ले सुरु केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT