Supreme Court on Irregular Appointment esakal
देश

नियुक्ती अनियमित असली तरीही कर्मचाऱ्यांना कामाचा पगार द्यावा : SC

सकाळ डिजिटल टीम

Supreme Court on Irregular Appointment : नवी दिल्ली : नियुक्ती अनियमित असली तरी, कर्मचार्‍यांनी केलेल्या कामासाठी राज्याला पगार देणे गरजेचे आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) नोंदवलं. एका शिक्षकानं उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेताना न्यायालयानं हे मत मांडलं आहे.

अनियमित शिक्षक असल्यामुळे एका शिक्षकाला २४ वर्ष सेवा दिल्यानंतर नोकरीवरून काढण्यात आले. ते निवड समितीच्या सदस्याचे नातेवाई होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती नियमांच्या विरोधात असल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. ही नियुक्ती रद्द करताना राज्याने त्यांना दिलेले वेतन वसूल करण्याचे निर्देशही दिले होते. पण, संबंधित शिक्षकाने राज्याच्या निर्देशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, न्यायालयानं कुठलाही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच उच्च न्यायालयाने या व्यक्तीच्या कामाचे कौतुक करायला पाहिजे होते. नियुक्ती अनियमित असली तरीही याचिकाकर्त्याने तब्बल २४ वर्ष कर्तव्यं पार पाडली होतं. त्या कामाच्या बदल्यात त्याला पगार देणे गरजेचे आहे. हे सत्य विचारात घेण्यात उच्च न्यायालय अपयशी ठरल्याचे आढळून आले आहे. राज्य सरकार कोणत्याही कर्मचाऱ्याकडून पगाराशिवाय कोणतंही काम करून घेऊ शकत नाही. कर्मचारी अनियमित असेल तरीही त्याने केलेल्या कामाचा मोबदला राज्य सरकारने देणे गरजेचे आहे, असं मत न्यायालयानं मांडलं.

उच्च न्यायालयाने दिलेला आदेश बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिलासा दिला. तसेच याचिकाकर्त्या शिक्षकाला सेवानिवृत्त समजून त्याने प्रदान केलेल्या सेवांसाठी निवृत्तीवेतन आणि इतर लाभ देण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT