Ramdev baba esakal
देश

Ramdev baba : रामदेवबाबांची माफी सुप्रीम कोर्टाने फेटाळली; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन तीनदा बजावलं तरीही...

कोर्टाने रामदेव बाबांनी मागितलेली माफी फेटाळून लावत प्रतिज्ञापत्रात धोकेबाजी करत असल्याचा ठपका ठेवला. कोर्टाने बिनशर्त माफीच्या रामदेव बाबांच्या शपथपत्राला स्वीकार करण्यास नकार दिला.

संतोष कानडे

Baba Ramdev in Supreme Court : बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन सुप्रीम कोर्टाने बुधवारी पुन्हा सुनावणी घेतली. कोर्टाने पुन्हा बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना फटकारलं.

कोर्टाने रामदेव बाबांनी मागितलेली माफी फेटाळून लावत प्रतिज्ञापत्रात धोकेबाजी करत असल्याचा ठपका ठेवला. कोर्टाने बिनशर्त माफीच्या रामदेव बाबांच्या शपथपत्राला स्वीकार करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या बेंचने या प्रकरणाची सुनावणी घेतली.

यावेळी कोर्टाने म्हटलं की, तीन-तीन वेळेस आमच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील, आम्ही आंधळे नाहीत. केंद्र सरकारने या प्रकरणात दाखल केलेल्या उत्तरावरही कोर्टाने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, बुधावरी झालेल्या सुनावणीच्या पूर्वी मंगळवारी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोर्टासमोर बिनशर्त माफी मागितली होती. त्यापूर्वीच्या सुनावणीमध्ये कोर्टाने दोघांना फटकारलं होतं. स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू नये, असा सल्ला कोर्टाने रामदेव बाबांना दिला होता.

२ एप्रिलला कोर्टात काय झालं?

  • पतंजली आयुर्वेदच्या वकिलांनी पुढे म्हटलं की, स्वतः रामदेव बाबा कोर्टात हजर असून ते माफी मागत आहेत. कोर्टाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही कोर्टापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाहीत.

  • वकिलांनी पुढे म्हटलं, या प्रकरणासंदर्भात मी काही मजकूर वाचू शकतो का? दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात चालली.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये पतंजली या कंपनीला आदेश दिला होता की, त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवाव्यात. जर त्यांनी असं केलं नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल. नाहीतर पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात किती रुपये? तुमच्या शहराचा भाव पाहा

Gokul Dudh Sangh Dispute : 'गोकुळ' सुनावणीवरून दुग्ध विभागात गोंधळ; नोटिसीशिवाय सुनावणी म्हणजे अधिकाऱ्यांची हुकूमशाही, दूध उत्पादकांचा संताप

Marathi News Live Updates : साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Mhasurli Clinic Inspection: खासगी दवाखान्यांत अनोळखींकडून पाहणी म्हासुर्लीत खळबळ ः महिला, पुरुषांचा समावेश; चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद

Sugar Prices Fall: साखर दरात घसरण; पण ग्राहक नाही; किरकोळ बाजारात मात्र महागच

SCROLL FOR NEXT